Agricultural land rights: शेतीच्या विषयावरून अनेक ठिकाणी वाद झाल्याची प्रकरणं आपण नेहमी पाहतच असतो शेती. शेती म्हटलं की वाद, भांडण ही आलीच. शेतजमिनीच्या वाटणीवरून, रस्त्यावरून किंवा बांधावरून अनेक वेळा ही भांडणं होत असतात. बऱ्याच ठिकाणी शेतजमिनीचा रस्ता अडवला जातो, बांध कोरला जातो अशा अनेक समस्या शेतकऱ्यांसाठी नेहमीच पुढे उभ्या राहत असतात.
अनेक लोक या भांडणामुळे त्रस्त होतात. यामधून मार्ग कसा काढायचा हे त्यांना सुचत नाही. अशा परिस्थितीत कधी कधी हे वाद टोकाला देखील जातात. पण आता अशा लोकांना कायदेशीर पद्धतीने तुम्ही धडा शिकवू शकता. चला तर मग अनधिकृतपणे कोणी बांध कोरत असेल तर त्याला कायदेशीर मार्गाने अतिक्रमण कसे हटवायचे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ..
जर तुमच्या जमिनीवर किंवा बांधावर कोणी अतिक्रमण केले असेल तर, त्याला तुम्ही कायदेशीर मार्गाने हटवू शकता. अतिक्रमण केल्याच्या घटना खेडेगावांमध्ये तसेच शहरांमध्ये देखील घडल्याच्या आपल्याला पाहायला मिळतात. शेत जमिनी बाबत या गोष्टी प्रामुख्याने पुढे येतात. विनाकारण त्रास देणाऱ्या लोकांना कायदेशीर मार्गाने कसे रोखायचे याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत.
कायदेशीर पद्धतीने अतिक्रमणाची तपासणी
जर आपण बांधावर काही खुणा केलेल्या नसतील तर शेजारचा व्यक्ती आपला बांध सातत्याने कोरत राहतो. व त्यावर अतिक्रमण करतो त्याला आळा घालण्यासाठी पुढे दिलेल्या कायदेशीर मार्गाचा अवलंब तुम्ही करू शकता. जर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्या शेतजमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वप्रथम आपल्या शेतीची मोजणी करून घेणे आवश्यक असते.
या मोजणी मधील सरकारी अधिकारी तुमच्या शेताच्या चतुः सीमा निर्देशित करून देत असतात. त्यानुसार तुम्हाला खात्री पटेल की आपल्या जमिनीवर कोणी अतिक्रमण केलेले आहे की नाही. जर अतिक्रमण केलेले असेल तर त्या बाबतीत तुम्ही कायदेशीर तक्रार करू शकता. तर ती कशी करायची यासंबंधीत माहिती जाणून घेऊ.
मोजणी केल्यानंतर तुमच्या जमिनीची हद्द निश्चित करण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून तुमच्या जमिनीचा नकाशा ‘क’ प्रत तुम्हाला देण्यात येते. त्या नकाशावर तुमच्या जमिनीच्या सर्व बाजू दाखवल्या जातात आणि तुमच्या कोणत्या जागेवर अतिक्रमण झालेले आहे याबद्दल सुद्धा त्यामध्ये नमूद केले जाते. त्या आधारे तुम्ही कायदेशीर रित्या तक्रार करू शकता.
महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 कलम 138 नुसार कायदेशीर अर्ज कसा करावा?
शासकीय यंत्रणेकडून शेत जमिनीची तपासणी केल्याची प्रत घेऊन अर्जदार शेतकरी तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 च्या कलम 138 नुसार कायदेशीर अर्ज करू शकतात. अर्ज प्राप्त झाल्यानंतर तहसील कार्यालयातून त्या अर्जावर कार्यवाही केली जाते. या कारवाईमध्ये कायदेशीर रित्या कोणी दोषी आढळत असेल तर त्यावर योग्य ते कारवाई केली जाते. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे त्या संबंधित अधिक माहिती आपण पुढे जाणून घेऊ.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
शेतकऱ्याला ज्या क्षेत्रावर एखाद्याकडून अतिक्रमण करण्यात आले आहे असे जाणवते त्या भागाचा नकाशा अर्जासोबत जोडावा लागेल. जर शेतकऱ्यानी शासकीय यंत्रणेकडून शेत जमिनीची मोजणी केली असेल तर त्यांनी दिलेला नकाशा जोडणे आवश्यक असते. ज्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा झाल्याची तक्रार शेतकऱ्याला करायची असते त्या जमिनीचा चालू वर्षातील सातबारा अर्जासोबत जोडणे आवश्यक असते.
..अशाप्रकारे अतिक्रमण हटवले जाईल
अतिक्रमण झालेल्या जमिनीवर कोर्टामध्ये एखादा खटला चालू असेल तर त्यासंबंधीचे दस्तऐवज अर्जासोबत जोडावे लागतात. या सर्व कागदपत्रांसहित शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तालुका तहसील कार्यालयात जाऊन याचा रीतसर अर्ज द्यायचा आहे. त्यावर योग्य ती कारवाई कार्यालयाकडून केली जाते आणि जर तुमच्या जागेवर अतिक्रमण झाले असेल तर ते देखील हटवण्यात येते.
हे पण वाचा » शासनाचा मोठा निर्णय, आता महिलांना मिळणार 4500/- रुपये; लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ!
हे पण वाचा » ‘लाडकी बहीण’ प्रमाणे सरकारच्या ‘या’ 4 योजना सुद्धा देतात महिन्याला 1500/- रुपये; जाणून घ्या सविस्तर!