आता आले “ऑटो टॉप-अप फीचर”, GPay/ PhonePe वापरकर्त्यांना होणार फायदा! | UPI Payment rule change

UPI Payment rule change: यूपीआय Lite युझर्ससाठी १ नोव्हेंबर २०२४ पासून दोन महत्त्वाचे बदल झाले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने यूपीआय लाइटच्या व्यवहार करण्याच्या मर्यादेत वाढ केली आहे. नवीन नियमांनुसार, यूपीआय लाइट वापरकर्त्यांना प्रत्येक व्यवहारासाठी ५०० रुपयांच्या ऐवजी १,००० रुपयांपर्यंतची रक्कम खर्च करता येणार आहे.

यामुळे छोटे व्यवहार करणाऱ्या युझर्ससाठी विशेष फायदा मिळणार आहे. याबरोबरच, यूपीआय लाइट वॉलेट (UPI Lite wallet) मध्ये जास्तीत जास्त ५,००० रुपये ठेवण्याची मुभा देखील देण्यात आली आहे.

हे पण वाचा:  तुमच्या एरियात BSNL ची रेंज आहे की नाही? सिमकार्ड घेण्यापूर्वी असे करा चेक.. | How can I check BSNL 4G in my area

यूपीआय लाइटच्या वापराची सुलभता

UPI Lite हे एक वॉलेट आहे, जे युझर्सना यूपीआय पिन न टाकता छोटे व्यवहार करण्याची परवानगी देते. सध्या, युझर्सना त्यांच्या बँक खात्यातून वॉलेट बॅलन्स मॅन्युअली रिचार्ज करावे लागते, परंतु नवीन फीचरच्या सहाय्याने ही प्रक्रिया सुलभ होणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने या सुविधेची घोषणा २ ऑगस्ट २०२४ रोजी केली होती.

ऑटो टॉप-अप फीचर

दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे यूपीआय लाइटमध्ये समाविष्ट होणारे नवीन ऑटो टॉप-अप फीचर. १ नोव्हेंबरपासून, जर युझर्सचा यूपीआय लाइट बॅलन्स एका निश्चित मर्यादेच्या खाली गेला, तर सिस्टम आपोआप त्यात पैसे अॅड करेल.

हे पण वाचा:  सर्वसामान्यांना झटका, खाद्य तेलाच्या किमतीत मोठी वाढ! असे आहेत नवीन दर

युझर्सना मॅन्युअल रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. या सुविधेमुळे पेमेंट प्रक्रिया नॉन-स्टॉप होईल, ज्यामुळे लहान आणि नियमित व्यवहार करणे अधिक सोपे होणार आहे.