सोन्याचे दर रोज का वाढत आहेत? 90 हजारांचा टप्पा गाठणार? आत्ताच खरेदीची योग्य संधी! | Gold Rate hike

Gold Rate hike: सध्या सणासुदीच्या काळात सराफा बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात दागिन्यांची खरेदी करत आहेत. या काळात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे, ज्यामुळे आगामी काळात ही वाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण सोन्याचे दर रोज का वाढत आहेत? लवकरच सोने 90 हजारांचा टप्पा गाठणार का? सोने खरेदीसाठी हा कालावधी योग्य आहे का? चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊ..

सोन्याच्या किमतीत वर्षभरात 34% वाढ

गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. साधारणतः 41 वेळा उच्चांक गाठल्यामुळे सोन्याच्या दरात 34 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीमागे जागतिक स्तरावर होणाऱ्या घडामोडी आणि देशांतर्गत असणारा सणासुदीचा कालावधी असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे पण वाचा:  शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा, केंद्र सरकारने दिली "डिजिटल कृषी मिशन" ला मंजुरी; जाणून घ्या सविस्तर..

सणासुदीच्या काळातील तेजी

गेल्या काही दिवसांपासून जागतिक स्तरावर घडणाऱ्या घडामोडींमुळे, विशेषतः अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे, तसेच आखाती देशांमधील अस्थिरतेमुळे सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे. त्यामुळे भविष्यातही सोन्याची दरवाढ अशीच राहणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सोनं 82 हजारांच्या पुढे

सोन्याने आता 80 हजार रुपयांचा टप्पा पार केला असून मल्टि कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर डिसेंबरमध्ये वितरीत होणाऱ्या सोन्याचे दर वाढून 78,443 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. दिवाळीच्या एक दिवस आधी दिल्लीत सोन्याचा दर 1 हजार रुपयांनी वाढून 82,000 रुपयांवर पोहोचला होता.

हे पण वाचा:  दिवाळीनंतर सोन्याच्या भावात मोठी घसरण; पहा आजचे सोने बाजारभाव | Gold rates fall after Diwali

भविष्यात सोन्याचा दर 90 हजारांवर पोहोचणार?

सोने बाजारातील तज्ज्ञांच्या मते, भविष्यात सोन्याचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या काळात सोनं प्रति तोळा 86,000 रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, आणि दीर्घ काळाचा विचार करता त्याची किंमत 87,000 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यामुळे भविष्यात सोनं 90,000 रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

अमेरिकेतही सोन्याचा भाव वाढणार

अमेरिकेतही सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कॉमेक्सवर सोनं मध्यम अवधीत 2,830 डॉलर्स प्रति औंस आणि दीर्घकाळात 3,000 डॉलर्स प्रति औंसपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

हे पण वाचा:  आता घराचे स्वप्न होणार पूर्ण! प्रधानमंत्री आवास योजनेत झाले मोठे बदल; जणून घ्या..

सध्याची असणारी परिस्थिति आणि भविष्याच्या अंदाजावरून सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. या सर्व बाबी लक्षात घेत, सणासुदीच्या काळात सराफा बाजारात सोन्याची मागणी वाढत आहे.