PM Ujjwala Yojana Free Gas: दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना खास भेट देण्यासाठी योजना आखली आहे. या अंतर्गत १ लाख ८४ हजार ३९ लाभार्थ्यांना मोफत LPG सिलेंडर दिले जाणार आहे. योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरची संपूर्ण किंमत आधी रोखीने भरावी लागेल, आणि तीन ते चार दिवसांनंतर तेल कंपन्यांकडून सबसिडीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल.
केंद्र सरकार देतंय मोफत गॅस सिलेंडर
ज्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेले आहे त्याच लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारने सणांच्या निमित्ताने दोन वेळा मोफत गॅस सिलेंडर देण्याची घोषणा केली आहे.
यासाठी ग्राहकांनी आपल्या गॅस एजन्सीशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लाभार्थींचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी जोडलेले आणि प्रमाणित असणे अनिवार्य आहे. योजनेअंतर्गत १४.२ किलो वजनाचा सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे.
१० कोटींपेक्षा अधिक महिलांना लाभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये “प्रधानमंत्री उज्ज्वला योजना” सुरू केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण कुटुंबांना मोफत LPG कनेक्शन देऊन त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि पर्यावरणस्नेही इंधनाच्या वापरास प्रोत्साहन देणे हा आहे.
आतापर्यंत १० कोटींपेक्षा अधिक महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे. ही योजना मुख्यतः ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्यंत लाभदायक ठरली आहे.
लाभार्थ्यांना १६०० रुपयांची आर्थिक मदत
उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन घेतल्यास लाभार्थ्यांना १६०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, जेणेकरून ते गॅस कनेक्शन संबंधित इतर वस्तू खरेदी करू शकतील.
तसेच, गॅस स्टोव्ह खरेदी करण्यासाठी सरकार EMI सुविधा देखील उपलब्ध करून देते. यामुळे कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना गॅस सुविधा सहज खरेदी करता येते.
हे पण वाचा » ‘लाडकी बहीण’ डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितले..!
हे पण वाचा » दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, भाव ‘इतका’ झाला!