Ladki Bahin Yojana Status Check Online: राज्यातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत सरकारकडून महिलांना दरमहा 1500/- रुपयांची आर्थिक मदत देऊ केली जाणार आहे. या योजनेची संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. तसेच कोट्यावधी महिलांनी यासाठी अर्ज देखील दाखल केले आहेत.
माझी लाडकी बहीण योजनेचे स्टेटस कसे तपासायचे?
जून-जुलै मध्ये अर्ज केलेल्या महिलांना त्यांचा 1500/- रुपयांचा हप्ता बँक खात्यामध्ये जमा झाला आहे. 1 ऑगस्ट पासून पुढे अर्ज केलेल्या महिलांनी त्यांची स्टेटस तपासून घ्यायचे आहे. स्टेटस जर “रिजेक्ट” झाले असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचे 1500/- रुपये मिळणार नाहीत. तर हे स्टेटस कसे तपासायचे याबद्दल अधिक माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
माझी लाडकी बहीण योजना काय आहे?
राज्यातील आर्थिक दुर्बल महिलांचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलेला दर महिना 1500/- रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून दिले जात आहे. ही रक्कम DBT (Direct Bank Tansfer) द्वारे थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे. या रकमेतून महिला त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतात.
गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांसाठी अतिशय फायदेशीर असणारी लाडकी बहीण योजना मोठी लोकप्रिय झाली आहे. या योजनेचे ऑनलाइन स्टेटस कसे तपासायचे ते जाणून घेऊ. माझी लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट द्वारे स्टेटस कसे तपासायचे ते पाहू.
अधिकृत वेबसाइट वरुन माझी लाडकी बहीण योजना स्टेटस तपासा:
- सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईट (https://ladakibahin.maharashtra.gov.in/) वर जावे.
- त्यानंतर तुमच्यासमोर पुढे दिल्याप्रमाणे होम पेज ओपन होईल.
- वेबसाईटवर दिलेल्या होम पेजवरील मेनू बार मध्ये “अर्जदार लॉगिन” या बटनावर क्लिक करावे.
- त्यानंतर लॉगिन पेज उघडेल
- सर्वप्रथम त्यामध्ये मोबाईल नंबर प्रविष्ट करावा.
- त्यानंतर तुमचा पासवर्ड प्रविष्ट करावा.
- त्यानंतर पुढे कॅपच्या कोड दिलेला असेल तो कॅपच्या कोड जसाच्या तसा त्या बॉक्समध्ये प्रविष्ट करावा.
- त्यानंतर “लॉगिन” बटनावर क्लिक करावे.
- त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
- यामध्ये असणाऱ्या (👁) चिन्हावर क्लिक करावे.
- अर्जदाराची संपूर्ण माहिती तुमच्या समोर दिसेल.
अशाप्रकारे अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे स्टेटस तुम्ही तपासून शकता.
नारीशक्ती दूत ॲप द्वारे माझी लाडकी बहीण योजना स्टेटस तपासा:
लाडकी बहीण योजनेचे स्टेटस तपासण्याची दुसरी पद्धत म्हणजे नारीशक्ती दूत ॲप. याद्वारे योजनेचे स्टेटस कसे तपासायचे हे आपण जाणून घेऊ.
- सर्वप्रथम (https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot&hl=en) या लिंक द्वारे तुम्ही नारीशक्ती दूत ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करा.
- त्यानंतर ते ॲप ओपन करा.
- मोबाईल मध्ये एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुमचा मोबाईल टाका.
- आणि “Accept terms and conditions” या बॉक्समध्ये टिक ✅ करून “लॉगिन” बटणावर क्लिक करावे.
- त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवला जाईल.
- तो OTP अचूक रित्या प्रविष्ट करायचा आहे.
- या पेजवर असणारी माहिती योग्यरीत्या भरून नंतर “अपडेट” या बटनावर क्लिक करावे.
- त्यानंतर पुढे एक विंडो ओपन होईल.
- त्यावर “प्रोफाइल” या ऑप्शनवर क्लिक करावे.
- त्यानंतर “अर्ज विकल्प” पर्यायावर क्लिक करावे.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल.
- त्यामध्ये तुमच्या “अर्जाचा क्रमांक” प्रविष्ट करावा.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेटस दिसेल.
अशाप्रकारे नारीशक्ती दूत ॲप वरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने माझी लाडकी बहीण योजनेचे स्टेटस तपासू शकता.
हे पण वाचा » BSNL चा नवीन प्लॅन! 600 GB डेटा, कॉलरट्यून, OTT सबस्क्रीप्शन, 365 दिवस व्हॅलिडीटी, 5G स्पीड; जाणून घ्या..
हे पण वाचा » रेशन दुकानात तांदूळ बंद! आता मसाल्यासह ‘या’ ९ गोष्टी मोफत देणार सरकार; योजनेत केला मोठा बदल..