Majhi Ladki Bahin Yojana Last Date Extend: महाराष्ट्र सरकारने गेल्या तीन महिन्यापूर्वी एक ऐतिहासिक योजना सुरू केली, ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. राज्यभरातून या योजनेला महिलांचा अतिशय सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आजपर्यंत राज्यभरातून 2 कोटी पेक्षा अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे. राज्य सरकारकडून, या योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन हप्त्यांचे वितरण देखील करण्यात आले आहे.
अजून सुद्धा या योजनेसाठी अर्ज करण्याची लगबग महिलांकडून सुरू आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करून अनेक महिला आज देखील अर्ज भरत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 पर्यंत होती. पण पात्र महिलांचा मोठा उत्साह पाहून राज्य सरकारकडून या योजनेची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेऊ शकतो.
लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची मुदत वाढणार का?
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या अनेक महिला उमेदवारांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत. 31 ऑगस्ट नंतर देखील महिलांकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरूच आहे. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक तांत्रिक अडचणी देखील येत आहेत. अनेक वेळा प्रयत्न करून देखील पात्र महिलांच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर अर्ज करण्याची मुदतवाढ राज्य सरकारकडून देण्यात येऊ शकते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या महिलांना दरमहा १५००/- रुपये दिले जात आहेत. जुलै महिन्यापासून हा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. दीड कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात 3 हजार रुपयांची रक्कम जमा झाली आहे. अनेक महिलांना या योजनेसाठी लाभ मिळाला नाही, कारण त्यांचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नाही.
‘या’ महिलांना पात्र असूनही पैसे मिळाले नाही
40 ते 42 लाख पात्र महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नसल्यामुळे त्यांना या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. या योजनेसाठी पात्र असून सुद्धा 21 ते 65 वर्षांच्या अनेक महिलांनी अर्ज केलेले नाहीत. या महिलांना देखील योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकार पुढील एक महिन्याचा कालावधी वाढवून देऊ शकतो.
ज्या महिलांनी अजून पर्यंत अर्ज केलेले नाहीत अशा महिलांनी ताबडतोब आपल्या योग्य कागदपत्रासह अर्ज दाखल करावा आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या 1500/- रुपये प्रति महिना हा थेट लाभ आपल्या बँक खात्यामध्ये मिळवावा.
‘हे’ काम एकदा नक्की करा
काही महिला अर्जामध्ये पात्र झालेल्या असून देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज त्यांना आलेला नाही. तर अशा महिलांनी तात्काळ आपले खाते चेक करून घ्यावे. कारण मोठ्या प्रमाणावर पैशाचे ट्रांजेक्शन झाल्यामुळे बँकेच्या काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे जमा होऊन देखील त्याचा मेसेज मोबाईलवर आलेला नाही.
ही समस्या अनेक महिलांसोबत झालेली आहे. त्यामुळे तात्काळ आपल्या बँक अकाउंट चे ट्रांजेक्शन चेक करावे ही प्रक्रिया तुमच्या मोबाईल द्वारे नेट बँकिंग मधून देखील तुम्ही करू शकता किंवा आपल्या बँक शाखेमध्ये जाऊन खात्री करून घेऊ शकता.
हे पण वाचा » ‘या’ उपक्रमाद्वारे राज्य सरकार तरुणांना देणार 10,000/- रुपये प्रति महिना; जाणून घ्या..
हे पण वाचा » आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये, मुख्यमंत्री वयोश्री योजना; जाणून घ्या संपूर्ण माहिती